Posts

Showing posts from December, 2020

धडा ; पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीपासून...*

Image
*‘प्रहार’* रविवार, दि. २७ डिसेंबर २०२० *धडा ; पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीपासून...* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश आणि संस्थापक अध्यक्ष - ‘किसान ब्रिगेड’) _आज दिल्लीत शेतकरी सीमेवर त्याला अडचणीत आणणारे ३ कायदे रद्द करण्यात यावे याकरिता मागील महिन्यापासून गोठवणाऱ्या थंडीत कुडकुडत बसला आहे; मात्र सरकार भीक घालायला तयार नाही, कारण देश कार्पोरेट कंपन्यानी ताब्यात घेतला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे कमी खर्चाची विषमुक्त ‘सेंद्रीय शेती’ची चळवळ व ‘गाव तेथे किसान ब्रिगेड’चा बोर्ड लावणे, तेव्हा उठा आणि कामाला लागा._           पूर्वी शेतकरी शेतमाल घरी ठेवून असायचा आणि व्यापारी किंवा अडते गावोगाव फिरून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेतमाल जमा करायचे. त्या वेळेला मागणी-पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार पुरवठा कमी आणि मागणी जास्त होती आणि शेतकरी बियाणे, खते, मनुष्यबळ या बाबतीत स्वयंपूर्ण होता, म्हणजेच शेतकरी ‘दाता’ होता आणि शहरात राहणारे ‘याचक’ होते.           *हरित क्रांती झाली आणि परिणामी मागणीपेक्षा पुरवठा वाढला. त्यानुसार

सरकारच्या पिळवणुकीचा बळी शेतकरी...!

Image
  'प्रहार' रविवार, दि. २० डिसेंबर २०२० सरकारच्या पिळवणुकीचा बळी शेतकरी...! (लेखक : प्रकाश पोहरे, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) शेतीची झालेली दुरावस्था आणि सातत्याने शेतकऱ्यांवर होणारा अन्याय हे सर्व पाहता आता या मुद्द्यांवर म्हणजे शेतकऱ्यांच्या संख्येनुसार शेतकरी प्रतिनिधी हे विधानसभा व विधान परिषदेत तसेच लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये हे असणे आणि त्या अनुषंगाने लढा उभारणे हाच शेतकरी समस्यांवरचा अंतिम उपाय ठरणार आहे. ज्याप्रमाणे केवळ तीन टक्के असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या संघटनेच्या, एकजुटीच्या बळावर स्वतःकरिता वेतन आयोग लागू करून घेतला त्याच प्रमाणे शेतकऱ्यांनी या या मुद्यावर एकत्रित येऊन आपल्या हक्काचे प्रतिनिधी निवडणे आज कायमस्वरूपी तोडगा राहणार आहे; अन्यथा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७० वर्षे झाल्यानंतरही शेतकऱ्यांचे जे हाल झाले आहेत ते येणाऱ्या दिवसात सुद्धा सुरू राहतील.          राजधानी दिल्लीतील शेतकर्‍यांचे आंदोलन आता निर्णायक वळणावर पोहचल्याचे दिसत आहे. सरकारच्या कोणत्याही चक्रव्युहात न अडकण्याची खबरदारी शेतकरी घेत आहेत. आंदोलनाला राजकीय वळण लागू न

*पंजाबच्या शेतकर्‍यांचा वज्रनिर्धार**आणि हतबल मोदी सरकार...!*

Image
    *'प्रहार'* रविवार, दि. १३ डिसेंबर २०२० *पंजाबच्या शेतकर्‍यांचा वज्रनिर्धार* *आणि हतबल मोदी सरकार...!* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) _कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व संपवून शेती क्षेत्र कार्पोरेट क्षेत्राच्या हवाली करण्याची ही खेळी आहे. शिवाय शेतकर्‍यांना असलेले हमीभावाचे संरक्षणही काढण्याचा डाव त्यामागे आहे. वास्तविक शेती हे क्षेत्र सामायिक सूचीत समाविष्ट आहे, म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार शेती क्षेत्रासाठी नियम, कायदे करू शकतात, परंतु या नव्या कायद्याने राज्य सरकारच्या हातून शेती क्षेत्र निसटणार आहे आणि त्यावर केंद्राचे पूर्ण नियंत्रण येणार आहे. कार्पोरेट क्षेत्राला विना अडथळा शेती क्षेत्रात धुडगूस घालता यावा, यासाठीच हे केले जात आहे. या शेतकरी आंदोलनामुळे पंजाब व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमधील तफावत प्रकर्षाने दिसून येत आहे. पंजाबकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र आज जर काही शिकला नाही तर येणार्‍या काळात महाराष्ट्राचे निश्चितपणे फार मोठे नुकसान होणार आहे हे शेतकऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे आणि गावागावात किसान ब्रिगेड

गुजरातच्या विकासाकरिता महाराष्ट्राचा बळी!*

Image
*'प्रहार'* रविवार, दि. ६ डिसेंबर २०२० *गुजरातच्या विकासाकरिता महाराष्ट्राचा बळी!* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) _दिल्लीश्वरांना मराठी माणूस, मराठी मुलूख सतत खूपत असतो ही ऐतिहासिक परंपरा आजही कायम आहे. गुजरातचा किंवा अन्य कोणत्याही राज्याचा विकास होत असेल तर त्यात आक्षेप असण्याचे कारण नाही, परंतु महाराष्ट्राची मुंडी पिरगाळून या विकासाचे इमले उभे होत असतील तर ती बाब निषेधार्हच म्हणायला हवी._              दिल्लीच्या सिंहासनावर बसून संपूर्ण देशावर सत्ता गाजविण्याच्या औरंगजेबाच्या स्वप्नांना पहिले कडवे आव्हान दिले ते या महाराष्ट्राने, या मराठी मातीने. या मातीचा अंगभूत गुण असलेल्या शौर्याला आकार आणि दिशा देत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची पताका उभारली. मोगलशाही, आदिलशाही, निजामशाहीला एकाचवेळी टक्कर देत शिवाजी महाराजांनी आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले. अख्खा देश आपल्या टाचेखाली आणणार्‍या मोगली सल्तनतला हे छोटेसे स्वराज्य शेवटपर्यंत संपविता आले नाही. *दिल्लीश्वरांना कुणी आव्हान दिलेले तेव्हाही आवडत नव्हते, आजही आवडत