Posts

Showing posts from February, 2021
Image
  ‘प्रहार’   रविवार, दि. २८  फेब्रुवारी २०२१ ‘शेतकरी जगला , तरच  देश जगेल!'    (लेखक :  प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश आणि संस्थापक अध्यक्ष, ‘किसान ब्रिगेड’)  असे म्हणतात की, 'अगर सड़कें खामोश हो जांए तो संसद आवारा हो जाएगी...!' हे जाणूनच दिल्लीत लाखो शेतकरी सलग तीन महिन्यांपासून घरदार सोडून आणि लाखो ट्रॅक्टर घेऊन देशभरातल्या शेतकर्‍यांच्या हक्काची लढाई जेव्हा लढत आहेत, तेव्हा आपण किमान सायकल मार्च तर काढू शकतो!!! त्यामुळे यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता 'किसान ब्रिगेड'तर्फे ३ मार्च ते १७ मार्च, अशी १४ दिवसांची सायकल यात्रा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ३ तारखेला मातृतीर्थ सिंदखेडराजाहून या सायकल यात्रेला प्रारंभ होणार आहे. वाशिम, यवतमाळ, नांदेड, वर्धा, अमरावती मार्गे अकोल्याला समारोप असा ६ जिल्ह्यांतील एकंदर ९०० कि.मी.चा प्रवास ही यात्रा करणार आहे. समाजातील प्रत्येक जण या यात्रेत सहभाग घेऊ शकतो.          तुम्ही जंगलात आग लागली असताना चोचीत पाणी नेऊन टाकणार्‍या चिमणीची बोधकथा ऐकली असेल. जंगलाला जेव्हा आग लागली तेव्हा सर्व प्राणी,

‘प्रहार’ - वाचा आणि निर्णय घ्या!

Image
रविवार, दि. २१  फेब्रुवारी २०२१ (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश)  नैसर्गिक, विना-रसायन शेती करणारे कितीतरी प्रामाणिक शेतकरी आपल्या आजूबाजूला आहेत. आणि हाच विचार करून आम्ही मग शोध घ्यायला सुरुवात केली. अनेक शेतकरी आणि त्यांची शेतं आम्हाला ठाऊक आहेत, तसेच त्यांचे परिवारजनही. आता एक मोठा परिवारच तयार झालाय. रोज नवनवे लोक या मोहिमेत सामील होत चाललेत. जैविक शेती मिशन माध्यमातून त्यांची मोक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र चालू करून दिलीत. ग्राहकांनासुद्धा आता शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचे वास्तव उमगू लागलं आहे.        आज जगाला अनेक असाध्य आजारांनी व असाध्य रोगांनी घेरले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, हे असे पाचवीला पूजलेले आजार झाले आहेत, की जे एखाद्या व्यक्तीला झाले तर ते त्याच्या मृत्यूपर्यंत साथ देतात, सोबतच त्याचे सर्व अर्थकारण आणि घरातील वातावरण खराब करतात. या संदर्भात मी आपल्याला केवळ एकच प्रश्न विचारतो आणि तो म्हणजे, *'काय तुम्हाला अशी व्यक्ती माहिती आहे का, की जिला वर उल्लेखित कुठल्याही प्रकारचा एखादा आजार झाला आणि तिने अ‍ॅलोपॅथी डॉक्टरकडे जाऊन
Image
  ‘प्रहार’ रविवार, दि. १४ फेब्रुवारी २०२१ ‘हम दो, हमारे दो'...! (लेखक : प्रकाश पोहरे , मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश आणि संस्थापक अध्यक्ष - ‘किसान ब्रिगेड’) लोकसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, अमित शाह, मुकेश अंबानी, अदानी यांची नावे न घेता जे म्हटले, की 'हे सरकार 'हम दो हमारे दो' या घोषणेवर चालले आहे'; ते तंतोतंत खरे आहे. परिणाम सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत. सध्या भारतामध्ये मोदी सरकारच्या अशा वागण्यामुळे अडचणीची गोष्ट निर्माण झालेली दिसते ती अशी, की जिथे लोकशाही असूनही तिचा विस्तार आणि अंमलबजावणी होण्याऐवजी तिथे लोकशाहीचा बँडबाजा वाजलाय. लोकशाहीचे विसर्जन करण्याचा मोदी सरकारचा डाव दिसतोय. भांडवलदारांच्या चरणी लोकशाही वाहून टाकली गेली आहेच. मोदी सरकारचा हा हटवादीपणा आणि शेतकर् ‍ यांना 'खलिस्तानी' म्हणणार् ‍ या त्यांच्या समर्थक टोळ्यांची टगेगिरी, गुंडगिरी आता देशाची किती अप्रतिष्ठा करणार आणि हे सगळे कोण आणि केव्हा थांबवणार? हा चिंतनाचा विषय आहे. मोदी सरकारने लोकसभेत बहुमताच्या जोरावर, खरे तर 'व्हीप'च्या माध्यमातू