Posts

Showing posts from July, 2016

शिक्षकांच्या रिकाम्या हातांना काम द्या! प्रहार रविवार, दि.31 जुलै 2016

Image
काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचण्यात आली . राज्यात जवळपास 36 हजार शिक्षक अतिरिक्त आहेत आणि अजूनही त्यांचे समायोजन झालेले नाही . त्याचवेळी प्रशासकीय कामाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आणि ग्रामीण जनतेशी थेट संबंध असलेल्या महसूल तसेच कृषी सारख्या खात्यांमध्ये मात्र कर्मचाऱ्यांचा प्रचंड प्रमाणात तुटवडा आहे . पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे या दोन्ही विभागांच्या यंत्रणांवर ताण पडत असून त्याचा परिणाम या दोन्ही विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीवर होताना दिसत आहे . एकीकडे हजारोंच्या संख्येने अतिरिक्त शिक्षक आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा , या विषम परिस्थितीची सरकारला कल्पना नाही , असे म्हणता येणार नाही . हे शिक्षक अगदी कालपरवा अतिरिक्त ठरले , असेही नाही . किमान दोन ते तीन वर्षांपासून हे अतिरिक्त शिक्षक कोणतेही काम न करता वेतन घेत आहेत . खरे तर दोन - तीन वर्षांपासूनच हे शिक्षक अतिरिक्त आहेत , असे म्हणणेही चुकीचे आहे . दोन - तीन वर्षांपूर्वी राज्यात इतक्य