Posts

दि. 6 मार्च 2016 . मोदींनी मौन सोडून अधिक कठोर होण्याची गरज!

Image
मोदींनी मौन सोडून   अधिक कठोर होण्याची गरज! जवळपास अडीच दशकांच्या  कालखंडानंतर केंद्रात प्रथमच एका  पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे.  यापूर्वीच्या अडीच दशकांत केंद्रात  आघाड्यांचे सरकार असल्यामुळे  त्याचा स्वाभाविक परिणाम  सरकारच्या कार्यक्षमते,  निर्णयक्षमतेवर झाला होता.  आपल्या सहकारी पक्षांना नाराज न  करण्याच्या भूमिकेमुळे आर्थिक  किंवा अन्य क्षेत्रांमध्ये सरकारला धाडसाने कोणतीही भूमिका घेता  आली नाही. 'धोरण लकवा' हा नवा  शब्दप्रयोग मराठीत रूढ होण्याचे श्रेय  या आघाडी सरकारांनाच जाते.  सुदैवाने यावेळी मात्र केंद्रात एकाच  पक्षाचे स्थिर आणि मजबूत सरकार  स्थापन झाले आहे. त्यामुळे या सरकारने अधिक पारदर्शक, स्पष्ट,  कठोर आणि जलद निर्णय घेणे अपेक्षित आहे, तसे होताना दिसत  नाही. याचे कारण सरकारला विरोधकांकडून फारसा धोका नसला  तरी पक्षातील अंतर्गत सुप्त आणि उघड प्रवाह, संघासारखे  अतिबलाढ्य बाह्य सत्ताकेंद्र आणि अनेक मंत्रालयांचा कारभार  अगदीच अनुनभवी मंत्र्यांकडे असणे...

शेतकऱ्यांचा अंतिम लढा! २२ मे २०१६

Image
शेतकऱ्यांचा अंतिम लढा! शेतकऱ्यांनी आपले आंदोलन आता उत्पादनखर्च आधिक पन्नास टक्के नफा यावर आधारित हमीभाव या एकाच मागणीभोवती केंद्रित करावे आणि त्यासाठी रस्त्यावर उतरायची व कायदा हातात घेण्याची अजिबात गरजच नाही, तर न्यायालयात जाऊन कायद्याचाच आधार घेण्याची गरज आहे. आता हा अंतिम लढा बुध्दीने आणि एकत्र येऊन लढायचा आहे. त्याची पहिली पायरी म्हणजे राष्ट्रपतींना साकडे आंदोलन आणि सोबतीला न्यायालय, या दिशेनेच जोमाने पुढे जायला हवे. काही दिवसांपूर्वी संसदेत विरोधकांनी हे सरकार कृषी उत्पन्नावर आयकर लादू पाहत असल्याचा आरोप केला होता आणि त्याला प्रत्युत्तर देताना अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कृषी उत्पन्नावर कुठलाही कर लावला जाणार नसल्याचे संसदेतच स्पष्ट केले. खरे तर विरोधकांनी कृषी उत्पन्नावर कर लागू करण्याची मागणी करायला हवी होती आणि सरकारनेही कृषी उत्पन्नावर कर आकारणी करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता, परंतु सरकार आणि विरोधक दोघेही शेतकरी हिताच्या विरोधातच असल्यामुळे कृषी उत्पन्नावर कर आकारणीला दोघांचाही विरोध आहे. वरकरणी शेतकऱ्यांवर कर लादणे म्हणजे त्यांच्या आर्थिक अडचणीत भर घालणे अस...

भारत माता की जय दि. 15/05/16

Image
                    लोकांना सरकारी नोकरी किंवा आमदारकी , खासदारकी किंवा जि.प. , न.पा. , मनपा सदस्यत्त्व केवळ आर्थिक लाभाकरिताहवे असते , त्या पैशाचा मोबदला देताना मात्र ते कमालीचे बेजबाबदार असतात. ‘ स्वातंत्र देवतेची विनवणी ’ या कवितेमध्ये कवी कुसुमाग्रजांनी प्रभावशालीपणे त्याची जाणीव सरकारी नोकरांना व जनप्रतिनिधींना करून दिली आहे. त्यांच्या या बेजबाबदारीची कोणती किंमत सामान्य लोकांना मोजावी लागते , याची जाणीव त्यांना व्हावी म्हणून तरी सरकारने आपल्या सगळ्या वेतन , मानधनधारी सेवकांवर म्हणजेच जनप्रतिनिधींवर सरकारी सेवांचाच लाभ घेण्याची सक्ती करायला हवी. (वस्तुस्थिती ही आहे , की सार्वजनिक क्षेत्रांमध्येकाम करणारया आणि भरघोस पगार उपटणारया लोकांनीच या क्षेत्राचे इतके वाटोळे करून ठेवले आहे , की ते स्वत:च या सेवांचा लाभ घेणे टाळत असतात.) लोकांच्या सेवेचा आव आणून खानावळ सुरू करायची आणि आपण मात्रशेजारच्या हॉटेलात जाऊन जेवायचे , अशातलाच हा प्रकार म्हणावा लागेल. सरकारच्या विविध विभागांत काम करणारे किती कर्मचारी किंवा जनप्रतिनिधी स्वत:चा किंवा ...

भाकड गाई पाळणे हे केवळ शेतकऱ्यांचेच काम नव्हे प्रहार रविवार, दि.८ मे २०१६

Image
महाराष्ट्र शासनाने राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर त्या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने इतर राज्यांतून गोमांस येत असेल , तर त्याला आडकाठी करता येणार नाही , असा निर्णय दिला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने घेतलेला गोहत्या बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. राज्य सरकारने गोहत्या बंदी केली ; त्यामागे शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या  गोवंशाची वारेमाप कत्तल होत असल्याने शेतकऱ्यांना खूप नुकसान होत आहे , हा तर्क  दिल्या गेला. अधिकृतरित्या तसा तर्क दिल्या गेला असला , तरी हिंदुत्त्ववाद्यांना खूश करणे हेच त्यामागचे मुख्य कारण होते. अर्थात गोवंश शेतकऱ्यांसाठी  उपयुक्त आहे हे नाकारता येणार नाही. खरे तर शेतीसोबत गोवंश पालनाचा व्यवसाय शेतकऱ्यांनी केला तर त्याला त्यातून बराच फायदा होऊ शकतो , त्याला आर्थिक उत्पन्नाचा अजून एक चांगला मार्ग या माध्यमातून उपलब्ध होतो , परंतु त्यासाठी वेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जाणे गरजेचे होते. गोवंश संवर्धनाच्या योजना राबविता आल्या असत्या , शेतकऱ्यांकडे असलेल्या गोधनाच्या तुलनेत त्...

प्रसिद्धीचा सोस, न्याय, हक्क की भरकटणे? ०१/०५/१६

भारत एक मोठी बाजारपेठ असल्याचे मानले जाते, तशी ती नक्कीच आहे, परंतु इथे केवळ वस्तुच विकल्या जात नाही तर अस्मिता, विचार, स्वप्ने, उन्माद, लोकांचा सारासार विवेक असे सगळे काही विकले जाते किंवा त्यांचा धंदा मांडता येतो. त्या दृष्टीने विचार केला तर भारत नक्कीच जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणायला हवी. इथे कुणीही कोणत्याही प्रश्नावर आंदोलन करू शकतो आणि त्याला थोडी धार्मिक उन्मादाची फोडणी दिली की, ते आंदोलन अगदी शंभर टक्के यशस्वी होण्याची खात्री असते. आपल्याकडे धर्माचा, श्रद्धेचा, भावनेचा प्रश्न निघाला की लोकांच्या सारासार विवेकाला जणू काही लकवा मारला जातो आणि लोक अशा आंदोलनात डोके गहाण ठेवून सहभागी होतात.काल-परवापर्यंत जिचे कुणी नावही ऐकले नव्हते अशी एखादी महिला एका रात्रीत देशभरात ओळखली जाते, या चमत्काराचे श्रेय शनिला नक्कीच द्यावे लागेल.      शनिच्या संदर्भातील इतर चमत्कारांबद्दल काही सांगता येणार नाही, परंतु ‘त्या’ महिलेला एका रात्रीत शनिदेवाने 'स्टार' बनविले, हे शनिचेच महात्म्य म्हणावे लागेल. शनिच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा म्हणून या महिलेने आंदोलन उभे केले. म...