प्रहार रविवार , दि . 17 सप्टेंबर 2017 ` शिवाजी ' चा वाळवीने पोखरलेला वटवृक्ष पुन्हा डौलदार होईल का ? जोपर्यंत शिवाजी शिक्षण संस्था निस्वार्थी लोकांच्या ताब्यात होती तोपर्यंत संस्थेचे वैभव टिकून होते , मात्र वसंतराव धोत्रेंच्याच शब्दात सांगायचे तर ` वाणी संतांची आणि करणी सैतानाची ' असा अनुभव अॅड . शेळकेंच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात अनेकांना आला . अशा माणसांच्या हाती संस्था राहिली तर संस्थेचा वटवृक्ष कोसळायला वेळ लागणार नाही , याची जाणीव उशिराने का होईना सभासदांना झाली . भाऊसाहेबांच्या स्वप्नांचा हा इमला तसाच कायम ठेवायचा असेल , त्याचे वैभव वाढवायचे असेल तर या भव्य इमारतीला मुळापासून पोखरणारी वाळवी नष्ट करावीच लागेल आणि संस्थेचा कारभार पुन्हा सक्षम हातांकडे सुपूर्द करावा लागेल , याचे भान वेळीच आल्याने अगदी मोक्याच्या वेळी परिवर्तन घडवून आणण्यासाठी सभासद पुढे सरसावले ... एखादे कोणतेही मोेठे काम उभारायला अनेकांना आपल्या...